अखेर प्रतीक्षा संपली ! ‘पुष्पा २’ चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या अल्लू अर्जूनच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २: द रुल’चा टीझर अखेर आज रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन आज ४२ वा वाढदिवस असून त्याच्या वाढदिवशी टीझर प्रदर्शित करण्यात आलेला आहे. जवळपास एक मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनचा जबरदस्त अंदाज पहायला मिळतोय. या टीझरने चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता वाढवली आहे.

‘पुष्पा 2’चा हा टीझर पाहिल्यानंतर पहिल्या भागापेक्षा हा दुसरा भाग अधिक पॉवरफुल असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये अल्लू अर्जून काली देवीच्या लूकमध्ये पहायला मिळतोय. टीझरबद्दल सांगायचे तर, टीझरमध्ये एकही डायलॉग नाही. फक्त म्युझिक आणि अभिनेत्याच्या ॲक्शनने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

निर्मात्यांनी टीझरमध्ये, चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केली आहे. चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, पुष्पा 2 चा टीझर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. हा चित्रपट नुसता हिट नसून सुपरहिट ठरेल आणि बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडेल असा चाहत्यांचा दावा आहे. या चित्रपटाची क्रेझ त्याला मिळणाऱ्या व्ह्यूजवरून लक्षात येते. ‘पुष्पा 2’ च्या टीझरने येताच यूट्यूबवर खळबळ उडवून दिली.