नवी दिल्ली | देशातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यानुसार देशातील एकूण सात टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.
सात टप्प्यात मतदान
पहिला टप्पा – 19 एप्रिल
दुसरा टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून