प्रदीर्घ विश्रांतीनंतर
जळगाव । संपूर्ण ऑगस्ट महिना दडी मारून बसलेल्या वरुणराजाने राज्यात दणक्यात एंट्री मारली. प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात दहीहंडीच्या मुहुर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यातील अनेक भागात पावसाच्या सरी बारसल्याने खरीप हंगामातील शेतीपिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, रविवारपर्यंत राज्यात सर्वत्र मध्यम पाऊस असणार असून यंदा प्रथमच उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह धुळे जिल्ह्याला आज शुक्रवारी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यात पाऊस परतला आहे. गुरुवारी (ता. ७) जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हजेरी लावली. काही भागांत जोरदार, तर काही भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सायंकाळपर्यंत अधूनमधून बरसत होता. महिन्याच्या खंडाने कोमात गेलेल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.
आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण,मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे, ठाण्यासह पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या तसेच मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
जळगांव जिल्हा दि8/ 09/2023
अमळनेर-
बोदवड-5
भडगाव-74
भुसावळ-20.4
पाचोरा-62
पारोळा-61
जामनेर-
चोपडा-10
चाळीसगाव-10
रावेर-39
मुक्ताईनगर-
धरणगाव-27
यावल-4.3
एरंडोल-48
जळगाव-