मनोज जरांगे यांनी दररोज आपली वक्तव्ये बदलली. ते नेहमी खोटं बोलतात. जरांगे कॅमऱ्यासमोर बोलतात ते पारदर्शक आहेत, असं समजून जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मात्र त्यांनी २३ डिसेंबर रोजी पहिल्यांदा कन्हया हॉटेलमध्ये पहिली गुप्त भेट घेतली, असा धक्कादायक खुलासा जरांगेंच्या आंदोलनातील महत्वाचे सदस्य अजय महाराज बारसकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर हभप अजय बारस्कर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधताना बारस्कर हे सरकारचं प्याद असल्याचं सांगत हा महाराज नसून भोंदू बाबा असल्याचं म्हटलं होतं.