अजितदादांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; वाचा काय म्हणाले?

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कोणाचा यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. शरद पवार निवडणूक आयोगात दाखल झाले असून ते सुनावणीसाठी हजर आहेत. राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह नेमकं कोणाचा हा तिढा सुनावणीअंती सुटेल. त्याआधी दादा गटाकडुन शिवसेनेच्या निर्णयाचा दाखला देण्यात आला आहे. शरद पवारांची निवडच कायद्याला धरुन नाही. असं अजितदादांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे नियुक्त केलेल्या सर्व जागा बेकायदेशीर असल्याचे अजितदादा गटाने म्हटले आहे. तर, शिवसेनेच्या निर्णयाचा प्रतिज्ञापत्रात दाखला देण्यात आला आहे. अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड ही बहुमताने ३० जून रोजी झाली आहे. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवत असल्याचा युक्तीवाद यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय पक्षाचा दर्जासाठी संख्याबळ आवश्यक असल्याचा दावा ही अजित पवार गटाने केला. जयंत पाटलांचा कार्यकाळ संपला तरी त्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे अजित पवार गटाचे म्हणणे आहे.