मुबई : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही जनसन्मान यात्रा सुरु आहे. मात्र, या दौऱ्यात त्यांना धोका असून मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिली आहे.
अजित पवार उद्या मालेगाव, धुळे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाची पोलीस प्रशासनाला सूचना आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था
हल्ल्याच्या धमकीनंतर पोलिसांनी सर्व संभाव्य सुरक्षा व्यवस्था केल्या आहेत. त्यांच्या दौऱ्यांवर आणि ताफ्यांवर नजर ठेवली जात असून, आणखी सुरक्षा वाढविण्यावर विचार केला जात असल्याचे सांगण्यात आलेय.
जनसन्मान यात्रा, मोठा प्रतिसाद
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.