अजित पवारांनी काढली संजय राऊतांची इज्जत! वाचा काय म्हणाले

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत संजय राऊत यांच्याकडून अप्रत्यक्षपणे एकमेकांवर टीका टीप्पणी केली जात आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होतेय की काय? अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या विधानांचा समाचार घेत अजित पवार यांनी राऊतांच्या सर्व विधानांमधील हवाच काढून टाकली आहे.

ठाकरे गटाने रविवारी मुंबईत आयोजित केलेल्या राज्यव्यापी मेळाव्यात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच आमचे नेते असून अनेक भावी मुख्यमंत्र्यांची सध्या चर्चा आहे असं म्हणत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. आमच्या मनात असेल तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहू नाहीतर स्वत: भगवा फडकवू असंही म्हटलं होतं.

यावरुन अजित पवारांनी राऊतांना टोला लगावला आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तोपर्यंत संजय राऊतांना हे सरकार २५ वर्ष चालेल असं वाटत होतं. आता त्यांना त्यांच्या पक्षाचं स्वत:चं सरकार असावं असं वाटत असेल तर त्याच चुकीचं काय आहे? पक्ष एक ध्येय समोर ठेऊन पुढे वाटचाल करत आहे. आमचं यावर काहीही म्हणणं नाही. आमच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर आहे, अशी खोचक प्रतिक्रीया अजित पवारांनी नोंदवली आहे.