अजित पवार होणार मुख्यमंत्री; शरद पवार काय म्हणाले?

अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होणार अशा चर्चांना गेल्या काही दिवसांत उधाण आले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच आहे, असे ते म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुती सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. यातच आता अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. त्यानंतर शरद पवार यांना याबद्दल विचारले असता, अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच आहे, असे ते म्हणाले आहेत.
तसेच भाजपसोबत जाण्याचा आग्रह आमच्यातील काही लोकांचा होता. परंतु, सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा आग्रह छगन भुजबळांचा होता. तो आमचा प्रस्ताव नव्हता, असेही त्यांनी सांगितले. अकोला येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाले सर्वात आधी मी त्यांच्या गळ्यात पहिला हार घालेल, असे त्या म्हणाल्या आहेत.