नंदुरबार : अज्ञात वाहनाच्या धडकेतबिबट्या जागीच ठार झाल्याची घटना खेडले ता. तळोदा येथे २ रोजी घडली. या घटनेन हळहळ व्यक्त होतय.
तळोदा तालुक्यातील खेडले गावानजीक धानोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मादी बिबट रस्ता ओलाडत असताना तळोद्याकडे जात असलेल्या अज्ञात वाहनाने बिबटला जबर धडक दिल्याने त्याच्या तोंडाला व मानेला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने बिबटचा जागीचा मृत्यू झाला.
खेडले येथील नागरिक विजय पाटील, छोटूलाल पाटील, सतीश पाटील हे नियमित स्वरूपात सकाळी सहा वा. मॉर्निंग वाकला धानोरा रस्त्याकडे जात असतात. दरम्यान, २ रोजी मॉर्निंग वाकला जात असताना बिबट्या मृतवस्थेत रस्त्यात आढळून आला. त्यांनी या संदर्भात लागलीच तळोदा येथील वन अधिकारी यांना माहिती दिली.
त्यांनुसार तळोदा वन विभागाचे अधिकारी लक्ष्मण पाटील यांच्यासह वनपाल गिरधन पावरा, वनरक्षक वीरसिंग पावरा, राहुल कोकणी, जाण्या पाडवी,वाहनचालक सुरसिंग वळवी, दगडू पाडवी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी अजय मोलके आदी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला.
पशुवैद्यकीय अधिकारी अजय मोलके यांनी शव विच्छेदन केले. त्यात बिबट हा मादी असल्याचे निष्पन्न झाले असून वत्याचे वय साधारणतः तीन ते साडेतीन वर्ष असल्याचे सांगण्यात आले. ही घटना ५ ते ६ तास आधी घडल्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी बिबटला पाहण्यासाठी परिसरातील धानोरा तसेच खेडले, मोड,तऱ्हावद, मोरवड कढेल येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.