धडगाव : ग्रामपंचायतस्तरावर अतिरिक्त ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी फेक यूजर आयडी, पासवर्ड, मोबाईलचे रजिस्ट्रेशन करण्यात आल्याचे निर्देशात आले. ही नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांची संख्या वाढत असल्यामुळे त्या कामांचे नियोजन करणे व अंमलबजावणी करण्याचा ताण विद्यमान ग्रामरोजगार सेवकांवर पडत आहे. यामुळे सरकारने ग्रामपंचायतस्तरावर अतिरिक्त ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती केली आहे. मात्र, यात बेकायदेशीर यूजर आयडी, पासवर्ड, मोबाईलचे रजिस्ट्रेशन करण्यात आल्याचे निर्देशात आले. त्यामुळे या योजनेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकत असल्याने नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष किसन वसावे, पाध्यक्ष रोहिदास पावरा, सचिव लालसिंग वळवी, संदिप पावरा, किर्ता पराडके, काळुसिंग पाडवी, खेमा भिल, मेंदा पावरा, चंद्रकांत पावरा, दिनु पाडवी, भिका पाडवी, लालसिंग पाडवी, दशरथ वळवी, शिवाजी पावरा आदी उपस्थित होते.