अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती; जळगावमधील घटना

जळगाव : अल्पवयीन तरुणी अत्याचारातुन गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात घडलीय. पीडित अल्पवयीन तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून संशयित तरुणावर अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीवर संशयित विशाल बाबुराव कोळी ( 20) याने 13 जुलै 2023 ते 17 सप्टेंबर 2023 च्या दरम्यान वारंवार अत्याचार केला. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशियत कोळी हा पीडित तरुणीच्या घरात रात्री येऊन लहान भावाला जीव मारण्याची धमकी देऊन पीडितांचे तोंड दाबून वारंवार अत्याचार केला.

संशियत कोळी हा तब्बल तीन महिन्यांपासून पीडित तरुणीवर अत्याचार करत होता, त्यातून पीडित तरुणी गर्भवती झाली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीसात 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहे.