अदानींमुळे रेल्वेची तब्बल १४,००० कोटींची कमाई; जाणून घ्या कशी?

नवी दिल्ली : खासगीकरणाच्या नादात सरकरी कंपन्या अदानी-अंबानींच्या घशात घातल्याचा आरोप मोदी सरकारवर सातत्याने होत आहे. मात्र अंबानींमुळे भारतील रेल्वेने तब्बल १४ हजार कोटींचा महसुल कमविला आहे. याबाबत कंपनीने नुकतिच माहिती जारी केली आहे. अदानी समूहातील कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १२०.५१ एमएसटी रेल्वे कार्गो हाताळले आहे, जे मागील आर्थिक वर्षातील ९८.६१ एमएसटी पेक्षा २२.२% जास्त आहे.

भारतीय रेल्वेच्या जनरल पर्पज वॅगन इन्व्हेस्टमेंट स्कीम अंतर्गत मुंद्रा पोर्टने २०२२-२३ मध्ये १५,००० हून अधिक कंटेनर ट्रेन्स हाताळल्या. यात मीडिया रिलीजनुसार – आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, अदानी पोर्ट्सने भारतीय रेल्वेसाठी रेल्वे कार्गोमधून सुमारे १४,००० कोटी रुपयांचा महसूल मिळवला. आर्थिक वर्ष-२०२३ मध्ये मुंद्रा बंदराद्वारे चालवल्या जाणार्या डबल-स्टॅक कंटेनर ट्रेनमध्ये ४.३% ची वाढ नोंदवली गेली आहे.

कंपनीने जारी केलेल्या प्रेस रिलीझमध्ये असे म्हटले आहे की, ट्रेन्सवरील कंटेनरचे डबल स्टॅक लोडिंग ऊर्जा कार्यक्षम आणि विश्वासार्ह पद्धतीने वाहतूक सुनिश्चित करते, एकूण प्रति युनिट खर्च कमी करते आणि यामुळेच ग्राहकांचे समाधान होते. रेल्वे वाहतुकीच्या वापरामुळे मालवाहतुकीचा कार्बन फूटप्रिंट कमी होतो आणि कंटेनर ट्रेनच्या कार्यक्षमतेमुळे अतिरिक्त ट्रक वाहतुकीची गरज कमी होते. त्यामुळे कार्बन उत्सर्जनदेखील कमी होते.