अधिकारी होण्याची संधी! MPSC मार्फत विविध पदांची मोठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ चे आयोजन करण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल २७४ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत.

भरली जाणारी पदे :
राज्य सेवा, गट अ व गट ब (सामान्य प्रशासन विभाग) : २०५ जागा
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, गट अ व ब (मृद व जलसंधारण विभाग): २६ जागा
महाराष्ट्र वन सेवा, गट अ व गट ब (महसुल व वन विभाग) : ४३ जागा

आवशयक शैक्षणिक पात्रता :
महाराष्ट्र शासनाच्या या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून, त्याबद्दल माहिती खालीलप्रमाणे :

० राज्य सेवा, गट अ व गट ब – सामान्य प्रशासन विभागातील पदांसाठी :
कोणत्याही शाखेतील पदवी अथवा ५५ टक्के गुणांसह बी.कॉम + सीए / आयसीडब्ल्युए + एमबीए अथवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवशयक आहे.

० महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, गट अ व ब – मृदा व जलसंधारण गातील पदांसाठी :
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

० महाराष्ट्र वन सेवा, गट अ व गट ब – महसुल व वन विभागातील पदांसाठी :
उमेदवार हे रसायनशास्त्र / वनस्पतीशास्त्र / गणित / भौतिकशास्त्र / सांख्यिकी / प्राणीशास्त्र / उद्यानविद्या / कृषी पदवी अथवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

वयोमर्यादा :
सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे दिनांक ०१ एप्रिल २०२४ रोजी किमान वय हे १८ वर्षे तर कमाल वय हे ३८ वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे.
यामध्ये मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता वयांमध्ये ०५ वर्षांची सुट देण्यात येणार आहे.

अर्ज शुल्काविषयी :

जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या अधिकृत संकेतस्थळावर वर नमूद केलेल्या कालावधीच्या आधारे भरायचे आहेत.

सदर पदभरती प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५४४ रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता ३४४ परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

जाहिरात (Notification): पाहा