अनिष्का जाधवला गणित ओलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक


पाचोरा : गणित ओलिंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात नगरदेवळा येथील सरदार एस.के. पवार विद्यालयाचे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परिक्षेत विद्यालयातील एकुण ११ विद्यार्थी सहभागी झाले होते. इयत्ता पाचवीच्या वर्गातील अनिष्का योगेश जाधव या विद्यार्थीनीने 59.50 टक्के गूण संपादन करून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना ओलिंपियाड परीक्षाप्रमुख के एस शाह यांचे मार्गदर्शन लाभले. अनिष्का व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे ग्राम शिक्षण समितीचे सचिव व सर्व संचालक मंडळ, तसेच मुख्याध्यापक व्हि बी.बोरसे , उपमुख्याध्यापिका ए.बी साळुंखे,पर्यवेक्षक वाय.डी. ठाकूर,ए.सी.आमले यांनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---