अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट? विराट कोहली तातडीने परतला मुंबईत

भारतीय संघ विश्वचषकासाठी सज्ज झालाय. गुवाहाटीमध्ये इंग्लंडविरोधातील सराव सामना पावसामुळे रद्द झाला. आता दुसरा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ तिरुअनंतपूरममध्ये दाखल झाला.

रोहित शर्माच्या नेत्वातील भारतीय संघाचे तिरुअनंतपूरममध्ये विमानतळावर खेळाडूंचे जंगी स्वागत झाले. खेळाडूंच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तिरुअनंतपूरममध्ये भारतीय संघ विराट कोहलीशिवाय दाखल झाला. विराट कोहली घरगुती कारणासाठी गुवाहाटीवरुन मुंबईला गेलाय.

दोन दिवसांपासून अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा होत्या. त्यानंतर विराट कोहली तातडीने मुंबईला रवाना झाल्यामुळे या चर्चेला अजूनच बळ मिळाले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळपर्यंत विराट कोहली तिरुअनंतपूरममध्ये टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे.