---Advertisement---

अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी; जाणून घ्या सविस्तर

---Advertisement---

जळगाव : जळगाव जिल्हयातील सर्व प्राचार्य/मुख्याध्यापक व जळगांव जिल्हयात मॅट्रीकोतर शिक्षण घेणारे सर्व अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याव्दारे कळविण्यात येते की, अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ देणेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018- 19 या शैक्षणिक वर्षापासून पोर्टल सुरु करण्यात आलेले असून http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करणे आवश्यक आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता दिनांक 15 ऑक्टोबर,2024 पासून ऑनलाईन अर्ज भरणेस सुरुवात झालेली असून जुने/ नवीन विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याची कार्यवाही करावी, तसेच 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित असलेले व त्रुटीयुक्त अर्ज तात्काळ निकाली काढणेत यावेत, विद्यार्थ्यांनी शासननिर्णयातील अटी व शर्तीनुसार पात्र असलेले ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज तात्काळ करावेत, विद्याथ्यांनी तसेच महाविद्यालयानी अर्ज भरताना महाडीबीटी पोर्टलवर दिलेल्या मार्गदर्शक सुचना व नियमाचे वाचन करावे, त्रुटींच्या पूर्ततेसाठी परत पाठविलेले अर्ज विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयानी सुधारणा करून पुन्हा पाठविणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व महाविदयालयांची राहील, शिष्यवृत्तीचा लाभ विद्याथ्यांचे आधारसंलग्न बँक खात्यात हस्तांतरीत होत असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारसंलग्न करणे अत्यावश्यक राहील.

सन 2023 24 या शैक्षणिक वर्षातील 1596 इतके अर्ज व सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षातील 159 अर्ज महाविद्यालयाचे स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज शासननिर्णयाचे अधीन राहून दिनाक 05 मार्च, 2024 पर्यंत निकाली काढण्यात यावे,

सर्व महाविद्यालयांना कळविण्यात येते की, आपले स्तरवरुन सदर योजनेबाबत मोठया प्रमाणात प्रसिध्दी यावी, जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर योजनेबाबत माहिती मिळेत व विहित वेळेत विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरतील, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांनी कळविलेले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment