---Advertisement---

अनोख्या पद्धतीने गाडी सजवली, मुलांची नावं ठेवली उद्धव आणि राज, खास शिवसैनिक पोहचला पाचोरा सभेला

---Advertisement---

जळगाव : पाचोरा येथे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सभा होत आहे. सभास्थळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झाले असून  पुणे येथून आलेल्‍या एका शिवसैनिकाने  आपली दुचाकी अनोख्‍या पद्धतीने सजविली आहे. विशेष म्हणजे, या शिवसैनिकाने मुलांचे नाव उद्धव आणि राज ठेवले आहे त्यामुळे शिवसैनिक असावा तर असाच अशीच चर्चा होत आहे.

बाळासाहेबांच्या अगदी जवळ असलेला हा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती केलेली दुचाकी घेऊन चक्क पाचोरा सभेत दाखल झाला आहे. विशेषतः शिवसैनिक असावा तर असाच अशीच चर्चा होत आहे.

मुलांचे नाव उद्धव आणि राज
पुण्याहून आलेला हा अतरंगी शिवसैनिक खास आहे. शिवसेनेसाठी आपली संपूर्ण गाडी अनोख्या पद्धतीने सजवणारा हा वेडा शिवसैनिक या ठिकाणी शिवसैनिकांचे लक्षवेधी ठरत आहे. इतकेच नाही, तर अगदी आपल्या दोन मुलांचे नाव देखील उद्धव व राज ठेवत या शिवसैनिकाने आपले जीवन शिवसेनेसाठी अर्पण केले असल्याचे दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---