उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूरातील माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने माढ्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला आहे. भाषणादरम्यान मराठा आंदोलकांना एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांच्या गाडीत टाकून सभेतून बाहेर नेलं.
पोलिसांनी आंदोलकांना नोटिस बजावली आहे. पिंपळनेर येथे विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या गाळप हंगामाच्या शुभारंभासाठी अजित पवार हजर आहेत. त्यांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शरद पवार त्याच दिवशी माढ्यातील कापसेवाडीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २००९ साली सोकसभेसाठी बारामती सोडून माढा मतदार संघाला पसंती दिली होती. आणि त्या ठिकाणाहून निवडून देखील आले होते. सद्यस्थितीत शरद पवारांचे एकेकाळचे विश्वासू समजले जाणारे रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबत आहेत.