चाळीसगाव : रांजणगाव येथे एका शेतकर्यांच्या शेतातून जवळपास ५० हजारांचा कापूस चोरणारी टोळी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांंच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी चोरी गेलेला कापूस व वाहन असा एकूण १ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे पांढरे सोने चोरणार्यांचे धाबे दणाणले आहे.
पोलीस सूत्रानुसार, याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीसांत १९ डिसेंबर ०२२ रोजी मनोहर माधव पाटे (वाणी), वय ६८, धंदा-शेती, रा. रांजणगांव, ता. चाळीसगांव यांनी फिर्याद दिली. १८ डिसेंबर २०२२ रोजीचे सांयकाळी ६ ते १९ डिसेंबर २०२२ रोजीचे सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रांजणगांव शिवारातील शेतातील घराचा कडी कोयंडा तोडून घरात ठेवलेला ४९ हजार रुपये किमतीचा ७ क्विंटल कापूस चोरुन नेला. या प्रकरणी विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्यात तपासात आरोपींचा कोणताही मागमूस नसताना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपी अजय जयवंत पाटील (वय २५), प्रकाश उर्फ मुन्ना लक्ष्मण पाटील (२१), चंद्रकांत उर्फ बंटी गोकूळ मोरे (२५), शालीक अरुण पाटील (२५), सुरेश उर्फ पप्पू राजेंद्र कोष्ठी, वय २६, अ.नं. १, २ व ४, ५ रा. रांजणगांव, ता चाळीसगांव व आ.नं. ३ रा. जुना कोळीवाडा पिलखोड, ता चाळीसगांव आदिना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मिळून त्यांचेकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन १ लाख रुपये किमतीचे महिंद्रा पिकअप (क्र. एमएच ०४ – डीके – ४६१०) ही जप्त करण्यात आली.
त्याचप्रमाणे सदर आरोपी चंद्रकांत उर्फ बंटी गोकूळ मोरे याने चोरलेला कापूस पिलखोड येथील व्यापारी पवन दशरथ महाले याचेकडे त्यांच्या मालकीचा कापूस आहे, असे सांगून माल आता तुमच्याकडे कापूस ठेवा पैसे नंतर घेऊन जाऊ असे सांगून ठेवलेला होता. सदरचा चोरलेला ४९ हजार रुपये किमतीचा ७ क्विंटल कापूस सुध्दा जप्त करण्यात आले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, सफौ. राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ. नंदलाल परदेशी, पोना. शंकर जंजाळे, पोना. मनोज पाटील, पोना. संदिप माने, पोना . भूपेश वंजारी आदिच्यया पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली सफौ. राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.