…अन्‌‍ भर पावसात गिरणा नदीत आंदोलनाला बसले माजी खासदार

डॉ. पंकज पाटील
जळगाव : नार पार बचावासाठी माजी खासदार उन्मेश पाटील हे गिरणा बचाव कृती समितीच्या सदस्य व शेतकऱ्यांसह शुक्रवार, 23 रोजी भरपावसात जलसमाधी आंदोलन करत आहेत.

नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पास केंद्र शासनाची प्रशासकीय मान्यता घेवून केंद्र शासनाच्या निधीतून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा. गिरणा खोऱ्याच्या हक्काचे 30 टीएमसी पाणी गिरणा खोऱ्यात मिळावे या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या पाण्यावर अडीच लाख शेती सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करावा. कारण गेल्या 15 वर्षात गिरणा धरण तीन वेळाच शंभर टक्के भरले होते.

हा प्रकल्प पूर्ण करावा यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदने, मोर्च काढले, आंदोलने केलीत. पण त्याकडे शासनाने दुर्लक्ष्ा केले आहे. जोपर्यत यास प्रशासकीय मान्यता मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे माजी खासदारर तथा उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी सांगीतले.

– नार-पार योजनेसाठी गिरणा नदीपात्रात अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन सुरू आहे.
– जळगावच्या चाळीसगांव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात हे आंदोलन सुरू आहे.
– नार पारची लढाई आता आरपार झाली आहे.
– गिरणा पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू असुन नदीच्या पाणी पातळी वाढ होत आहे.
– मुसळधार पावसातही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.
– शिवसेना नेते उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलनं सुरू आहे.
– नार-पार योजनेसाठीगिरणा पट्ट्यातील शेतकरी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहे.
– जोपर्यंत नारपार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत – नाही तोपर्यंत गिरणा नदी पात्रात हे आंदोलन सुरूच राहणार असा पावित्र्य आंदोलकांनी घेतला आहे.
– आंदोलनाच्या ठिकाणी अग्निशमक दलाची तुकडी तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आले आहे.
– मेहुनबारे पोलीस या आंदोलनावर करडी नजर ठेवून आहे..