…अन् शरद पवार गटात खळबळ

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही आमदारांना सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांमकडून काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हावर दावा सांगण्यात येत आहेत.
दरम्यान, हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे गेले असून लवकरच यावर सुनावणी होणार आहे. त्याआधीच आता निवडणूक आयोग जो निर्णय येईल तो आपल्याला मान्य असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “निवडणूक आयोगाकडे दोन्ही बाजू गेलेल्या आहेत. तारखा दिल्यानंतर दोन्ही पक्ष आपापली बाजू मांडेल. त्यानंतर जो निर्णय येईल तो मी मान्य करणार आहे,” असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे शरद पवार गटात खळबळ उडाली आहे.
तसेच जर १६ आमदार अपात्र झाले तर तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “या बातम्यात काही तथ्य नाही. जोपर्यंत कुठला निकाल लागत नाही तोपर्यंत हे असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल याचा मी विचार करत नाही. मी फक्त विकासाचा विचार करतो,” असेही त्यांनी सांगितले.