---Advertisement---

अप्रतिम ऑफर; Hyundai च्या ‘या’ कारवर मिळतेय बंपर सूट, ऑफर एकदा पहाच..

---Advertisement---

नवी दिल्ली । तुम्ही जर Hyundai ची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी उपयुक्त ठरेल. होय, Hyundai तिच्या Grand i10 Nios, Aura, i20, i20 N Line, Alcazar आणि Kona EV वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या गाडीवर किती ऑफर आहेत ते..

Hyundai Grand i10 Nios
25,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज सूट आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आहे. अशा प्रकारे, एकूण 38,000 रुपयांपर्यंतची सूट आहे. या हॅचबॅकची किंमत 5.73 लाख ते 8.51 लाख रुपयांपर्यंत आहे.

ह्युंदाई ऑरा
20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज सूट आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आहे. अशा प्रकारे, एकूण 33,000 रुपयांपर्यंतची सूट आहे. या सेडानची किंमत 6.33 लाख रुपयांपासून ते 8.90 लाख रुपयांपर्यंत आहे.

ह्युंदाई i20
यावर 10,000 रुपयांपर्यंत रोख सवलत आणि 10,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त एक्सचेंज सूट दिली जात आहे. अशा प्रकारे, एकूण 20,000 रुपयांपर्यंतची सूट आहे. या प्रीमियम हॅचबॅकची किंमत 7.46 लाख ते 12.31 लाख रुपयांपर्यंत आहे.

ह्युंदाई अल्काझार
यावर फक्त 20,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त एक्स्चेंज सूट दिली जात आहे. या SUV ची किंमत 16.78 लाख ते 21.13 लाख रुपये आहे.

Hyundai Kona EV
यावर 1,00,000 रुपयांपर्यंत रोख सवलत दिली जात आहे. तसेच कोणतीही अतिरिक्त एक्सचेंज सूट किंवा कॉर्पोरेट सवलत नाही. त्याची किंमत 23.84 लाख ते 24.03 लाख रुपये आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment