अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप; 6.3 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता

तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। अफगाणिस्तानमधील भूकंपाचं सत्र सुरुच आहे. अशातच अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप झाल्याची बातमी समोर येतेय. पश्चिम अफगाणिस्तानमध्ये 6.3 इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला असून मध्यरात्री ३.३६ ला भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानमधील भूकंप हा सीरिया आणि तुर्कस्तानमधील भूकंपापेक्षा भयंकर असल्याचे मानले जाते.

सूत्रांनुसार, हेरात शहरामध्ये मध्यरात्री भूकंप झाला आहे. मध्यरात्री ३.३६ ला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे  जोरदार धक्के जाणवताच लोक घरातून आणि ऑफीसमधून बाहेर आले. मागील आठवड्याभरात भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या भूकंपामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर वित्त हानी देखील झाली आहे.

हेरातपासून 33 किलोमीटर 20 मैल अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. आज पश्चिम अफगाणिस्तानमध्ये ६.३ इतक्या तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.