तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। अफगाणिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपात १४ जणांचा मृत्यू झाला असून ७८ लोक हे गंभीर जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान मध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता हि ६.२ रिश्टर एवढी होती.
सूत्रानुसार, अफगाणिस्तान मध्ये झालेला हा भूकंप दुपारी १२ वाजून ४२ वाजण्याच्या सुमारास झाला आहे. अफगाणिस्तानात झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू हा हेरात शहराजवळील ४० किमी अंतरावर होता. शहरातील अनेक इमारती कोसळल्या आहेत. या घटनेमुळे मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूकंपाच्या हादऱ्यांनी अफगाणिस्तानमधील लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता. दिल्लीमध्येदेखील त्याचे हादरे बसले होते.
त्यावेळी ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता. अफगाणिस्तान गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या भूकंपात १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या वर्षी जूनमध्ये ही भूकंप झाला होता. त्यावेळी ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. गेल्या वर्षी जून महिन्यात हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर १५०० जण जखमी झाले होते.