अफगाणिस्तानात शनिवार, ७ रोजी झालेल्या महाप्रलयकारी भूकंपाने हाहाकार उडाला आहे. अनेक घरे जमीनदोस्त झाल्याने शेकडाे लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, या प्रलयकारी भूकंपात आत्तापर्यंत २ हजार ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. ९ हजार २४० लोक जखमी झाले आहेत. <
पश्चिम अफगाणिस्तानात शनिवारी ६.३ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहरापासून ४० कि.मी. अंतरावर होता. पहिला धक्का सकाळी ११ वाजता बसला. ६.३ क्षमतेच्या धक्क्याने इमारती हलू लागल्या. त्यानंतर पाठोपाठ तीन तासांत सात धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रताही ४.६ ते ६ रिश्टर इतकी तीव्र होती.
या शक्तीशाली प्रलकारी भूकंपाने अनेक मोठ्या इमारती, घरे पत्त्यासारख्या कोसळली याची संख्या १३२९ इतकी आहे. अनेक ग्रामीण व डोंगराळ भागात भूकंपामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या. या घटनांमुळे ढिगाऱ्याखाली अडकल्याने लोकांचा मृत्यू झाला. अजून मदतकार्य सुरू असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. असे देशाच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.