तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। चांद्रयान -३ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्रो पहिल्या मानवी मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. गगनयान असे नाव असलेल्या या मोहिमेची महत्वाची चाचणी या महिन्यात केली जाणार असल्याची माहिती इस्रोने दिली.
गगनयान मोहिमेतील अबोर्ट मिशन – १ चे प्रक्षेपण २१ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. इस्रोचे भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असून यामुळे अंतराळातील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी पहिल्या क्रू मोड्युलची पहिली अबोर्ट चाचणी २१ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले कि टीव्ही- डी १ ची पहिली मानवरहित चाचणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
गगनयान मोहिमेच्या प्रणालीची चाचणी करण्यासाठी टीव्ही – डी २ टीव्ही- डी ३ आणि टीव्ही – डी ४ अशा आणखी तीन चाचण्या करण्यात येणार आहेत. या चाचणीत १७ किमी उंचीवर चाचणी वाहनापासून क्रू मोड्युल वेगळे होणे अपेक्षित आहे.