तरुण भारत लाईव्ह । २० सप्टेंबर २०२३। ज्योतिशास्त्रात ग्रहांच्या युतीमुळे फरक पडतो. १७ सप्टेंबरला सूर्यदेव यांनी सिंह राशितून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या कालावधीचा काही राशींना फायदा होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
या काळात मेष राशींच्या व्यक्तींना बऱ्याच प्रमाणात फायदा होणार आहे. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. विद्यार्थाना यश मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. कुटुंबासोबत धार्मिक स्थळाला भेट द्याल.
वृषभ रास
या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. व्यवसायात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल.
मिथुन रास
या काळात या राशींच्या व्यक्तींना विविध प्रकारे फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. गुंतवणुकीचा फायदा होईल. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल. आरोग्य चांगले राहील.