अभाविपचे यंदाचे अनुभूती शिबिर कुठे आणि कधी आयोजन केलं आहे, शिबिरात सहभागी कसे व्हाल?

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,जळगाव चे बहुचर्चित व ग्रामीण जीवन, निसर्ग व श्रमानुभवाची अनुभूती देणाऱ्या ‘अनुभूती शिबीराचे’ आयोजन यंदा नैसर्गिक वारसा लाभलेल्या धार – शेरी या गावी केलेले आहे. शिबिर हे 2 जून पासून 4 जूनपर्यंत पूर्णवेळ चालवले जाणार असून उपस्थित विद्यार्थ्यांना जीवनात एक अविस्मरणीय अनुभव या शिबिराचा माद्यमातून मिळणार आहे. शिबिराच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्यात येऊन ठेपली आहे. या शिबिरास जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.

अमृतमहोत्सवा निमित्ताने अनुभूती शिबिरास विशेष आकर्षण देण्यात आलेले आहे. शिबिरात ट्रेकिंग,ट्रेझर हंट,कॅम्प फायर,हुनरबाज,ग्रामसंवाद, वनभोजन,श्रमदान अश्या निसर्गाच्या सानिध्यातील कार्यक्रमांद्वारे विदयार्थ्यांना निसर्ग व ग्रामीण जीवनाशी काही काळ एकरूप होता येणार आहे. यासह व्यक्तिमत्व विकास व सामाजिक-शैक्षणिक जीवन यावर सुद्धा गट चर्चा केली जाणार आहे.शिबिरात सहभागी होण्यासाठी 7385664373 या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करता येत आहे. विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभागी होऊन या वेळी सुट्टीचा योग्य वापर करून निसर्गाच्या सानिध्यात व सामाजिक उपक्रमांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगावने केले आहे.