वाशिंगटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिका दौर्यावर जाणार आहेत. या दौर्यापूर्वी व्हाईट हाऊसच्या बाहेर भारताचा आणि अमेरिकेचा राष्ट्रध्वज एकत्र फडकवण्यात आला आहे. या दोन ध्वजांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हाईट हाऊसच्या बाहेरील स्तंभांवर हे ध्वज लावण्यात आले आहेत. याबाबत अमेरिकेतील भारतीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
असा असेल दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौर्याचे वेळापत्रक समोर आले आहे. ते २१ जून रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यानंतर, २२ जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये त्यांचे औपचारिक स्वागत केले जाईल. याच दिवशी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ स्टेट डिनरचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतर, २३ जून रोजी पंतप्रधान मोदी एका सार्वजनिक कार्यक्रमात अमेरिकेतील भारतीय समुदायाला संबोधित करतील.
#WATCH वाशिंगटन डीसी (USA): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अमेरिका की राजकीय यात्रा से पहले व्हाइट हाउस के बाहर तिरंगा फहराया गया। pic.twitter.com/WhMkTfUsYS
— ANI_HindiNews (@AHindinews) June 16, 2023