---Advertisement---

अमरसिंह पंडितांनी थेट शरद पवारांनाच दिलं उलट उत्तर, काय म्हणाले?

---Advertisement---

बीड : शरद पवार यांच्यासभेनंतर आज बीडमध्ये अजित पवार गटाची सभा होत आहे. दरम्यान, शरद पवारांनी अमरसिंह पंडित यांचं नाव घेऊन टीका केली होती. ”अमरसिंह पंडित म्हणतात, शरद पवारांचं वय झालं त्यांच्याकडून आता काय होणार. त्यामुळे मी त्यांना सोडलं. ज्यांना सोडलं त्यांनी निदान वरिष्ठांकडून काही शिकायला मिळालं असेल त्याची जाण ठेवावी” असं शरद पवार म्हणाले होते.  त्यावर अमरसिंह पंडित यांनी शरद पवारांनाच उलट उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले आहे अमरसिंह पंडित?
अमरसिंह पंडित म्हणाले की, तुम्ही म्हणता माझे फोटो लावू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करु. पण मी म्हणतो शिवछत्रच्या देवघरामध्ये, पंडित कुटुंबाच्या देवघरामध्ये तुमचा फोटो आहे. तो जावून काढा.. पाहू तुमच्यात किती ताकद आहे ती.

पंडित पुढे म्हणाले की, साहेब आम्ही तुमच्यावर मनापासून प्रेम केलं. पण मी तुम्हाला विश्वास देता यानंतर निवडणुकांमध्ये नाही लावणार फोटो पण तुमचे संस्कार आमच्या मनातून काढाल का? तुमच्याच संस्काराने आम्ही पुढची लढाई लढू,असं अमरसिंह पंडित म्हणाले.

दरम्यान, पवारांचं वय झालं.. म्हणून अजित पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला. या पवारांच्या आक्षेपावर अमरसिंह पंडित म्हणाले की, जे मी बोलले ते तुमच्यादेखत बोललो, तुमच्या काळजीने बोललो.. तुमच्यामागे मी कधीही बोललो नाही. या वयात एवढं फिरणं बरं नाही, असं म्हणालो. त्यामुळे आपल्यावर आरोप करु नयेत, असं पंडितांनी स्पष्ट केलं.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment