केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बनावट व्हायरल व्हिडिओवरून दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना समन्स पाठवले आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलच्या सायबर युनिटची IFSO टीम आज सकाळी तेलंगणाला पोहोचली आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास केला. याप्रकरणी टीमने पाच जणांची ओळख पटवली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री अमित शहा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला फेक म्हणत भाजपने तेलंगणा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. हा व्हिडीओ बनावट असल्याचे सांगून भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी अशा बनावट व्हिडिओंमुळे हिंसाचारही घडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी गुन्हा दाखल केला होता.