अमित शहांनी अकोल्यातून निशाणा इंडिया आघाडीवर साधला, म्हणाले…

विदर्भातील अकोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडली. यावेळी अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. अमित शाह म्हणाले की, ही भूमी गजानन महाराज, संत गाडगेबाबांची भूमी आहे. आज हनुमान जयंती आहे आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत रामलल्लांचं भव्य मंदिर बनवलं आहे. हे इंडिया आघाडीवाले म्हणतात की राम मंदिर बनलं नव्हतं पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षांपर्यंत राम मंदिराचा मुद्दा अडकवून ठेवण्यात आला. तुम्ही मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं, त्यांनी पाच वर्षात भूमिपूजनही केलं, कोर्टात केसही जिंकली आणि प्राणप्रतिष्ठा देखील केली, असेही अमित शाह म्हणाले.