जळगाव । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्र राज्यातील दौरे वाढले असून अशातच देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शाहा (Amit Shah) देखील 5 मार्चला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. याच दौऱ्यात त्यांचे जळगावसह तीन जिल्ह्यात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
भाजपचे नेते अमित शाह 5 मार्चला महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे.
या दिवशी जळगावमध्ये युवासंमेलनाला अमित शाहा उपस्थित राहणार आहे. तसेच अकोला येथे क्लस्टरच्या बैठकीला शाहा हजर राहणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहरात शाहा यांची जाहीर सभा देखील होणार आहे. त्यामुळे अमित शाहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देखील जोरदार तयारी केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील अमित शाहा यांच्या यांचा महाराष्ट्र दौरा ठरला होता. परंतु, वेगवेगळ्या कारणांनी त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र आता एकदा 5 मार्चला अमित शाहा यांचा दौरा असणार असल्याचे समोर येत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देखील जोरदार तयारी केली जाण्याची शक्यता आहे.