मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणार्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या महिला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपी महिलेचे वडील अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. जयसिंघानी हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्याचेही समोर आले आहे. यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
माझ्या वडिलांविरोधात चुकीचे गुन्हे नोंद केलेत त्यांना या केसेसमधून सोडवा अशी मागणी करत अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग करणार्या तरुणीचे वडील अनिल जयसिंघानी आहेत. अनिल जयसिंघानी हा फरार आरोपी असून त्याचे क्रिकेट बुकींसोबत संबंध आहेत. त्याच्यावर १४-१५ ते गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली होती. याच जयसिंघानीचा उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संबध असल्याचे समोर आले आहे.
२०१४ मध्ये अनिल जयसिंघानी यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेल्याचा हा फोटो आहे. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी याबाबत ट्विट करून माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, आणखी एक आयुक्त, उद्धव ठाकरे आणि अनिल जयसिंघानी यांच्या संबंधांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. मागील सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात काय षडयंत्र रचलं होतं याची माहिती प्रियंका चर्तुवेंदीनी घ्यावी. या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेले अनिल जयसिंघानी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी आहेत. जयसिंघानी हे सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दोनवेळा नगरसेवकपदाची निवडणूक लढविली होती. २००२ मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी तत्कालीन आमदार पप्पू कलानी यांची तुरुंगामधून मुक्तता झाल्यावर शहरातील वातावरण कलानीमय झाले होते. ‘राष्ट्रवादी‘ला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. कलानी लाटेत जयसिंघानी हे ‘राष्ट्रवादी‘कडून नगरसेवकपदी निवडून आले होते. २०१४ मध्ये जयसिंघानी यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचं बोलले जाते.
EX CP Sanjay Panday + One More EX CP + Uddhav Thackerey + Anil JaiSinghani ( Bookie ) Relations To Be Inquired ! @priyankac19 Ji Must Be Aware About What Conspiracy Was Been Made In Last Government To Frame Shri Devendra Fadnavis Ji And Family !
Who Is Criminal Mastermind ? pic.twitter.com/2AkHzdmui0— Mohit Kamboj Bharatiya ( Modi Ka Parivar ) (@mohitbharatiya_) March 17, 2023