तरुण भारत लाईव्ह । २९ सप्टेंबर २०२३। सण उत्सवांचा काळ सुरु आहे. सणउत्सवांच्या काळात आपण बरीच खरेदी करत असतो. कपडे, दागिने किंवा इलेकट्रोनिक वस्तू खरेदी करत असतो. पण कोणी ऑनलाईन तर कोणी बाजारात जाऊन खरेदी करत असत. अमेझॉनने ग्राहकांसाठी ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२३ ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, आणि इतर अनेक गोष्टींवर सुट मिळते.
हा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल येत्या ८ ऑक्टबरपासून सुरु होणार आहे. या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल मध्ये डिव्हाइसेस आणि अॅक्सेसरीजवर ४० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.सेलमध्ये अलेक्सा, फायर टीव्ही आणि किंडल उपकरणांवर 55 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाऊ शकते.तसेच यामध्ये किचन अप्लायन्सेसवर ६० ते ७० टक्के सूट मिळू शकते. लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, टीव्ही आणि इतर गॅझेटवर ७५ टक्के सूट मिळू शकेल.तसेच आयफोन च्या सीरिजवर देखील मोठ्या प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता आहे.
जर तुमच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड किंवा असेल तर तुम्ही इएमआय वर वस्तू खरेदी करु शकतात किंवा त्यावर तुम्हाला १० टक्के सुट मिळू शकते. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल फायदा अमेझॉन प्राइमच्या सदस्यांना मध्यरात्रीपासून घेता येईल.