अमेठीमध्ये बनवले, शत्रूंची छाती फाडणार… लष्कराच्या हाती लवकरच AK-203

---Advertisement---

 

भारतीय लष्कराची ताकद आणखीनच मजबूत होणार आहे. भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नांनी बनवलेल्या कलाश्निकोव्ह AK-203 असॉल्ट रायफलची पहिली तुकडी उत्तर प्रदेशातील अमेठी येथे असलेल्या कोरवा आयुध निर्माणीमध्ये तयार झाली आहे. या रायफल्स लवकरच भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्यानंतर लष्कर नियमित ऑपरेशनमध्ये त्याचा वापर सुरू करेल.

भारतीय लष्करासाठी एकूण 6.01 लाख असॉल्ट रायफल तयार केल्या जात आहेत. लष्करासाठी तयार केले जाणारे हे घातक शस्त्र आता लष्कराच्या जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे. सेंट्रल कमांडच्या ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटरच्या प्रशिक्षित सैनिकांनी AK-203 असॉल्ट रायफलचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. या रायफलचे प्रशिक्षण देणारी भारतीय लष्कराची ही पहिली 15 सदस्यीय इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बॅच आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---