शेअर बाजार उघडले तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरची चमक पाहण्यासारखी होती. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना अमेरिकेने होळीची भेट दिलीय. होय, फेडरल रिझर्व्ह, सेंट्रल बँक ऑफ अमेरिकाने जूनमध्ये व्याजदर कपातीची अपेक्षा कायम ठेवण्याचे दिलेले संकेत, त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून आला आणि बाजार ग्रीन झोनमध्ये वळला. BSE सेन्सेक्समध्ये 700 हून अधिक अंकांची तेजी पाहायला मिळाली, तर NSE निफ्टीनेही 150 अंकांच्या वर झेप घेतली. 9:15 वाजता बाजार उघडला आणि अवघ्या 2 तासात लाखो कोटी रुपयांनी गुंतवणूकदारांचे खिसे भरले.
अमेरिकेमुळे मस्त साजरी होणार होळी, 2 तासात 5 लाख कोटींची भरली बॅग
Updated On: एप्रिल 29, 2024 11:05 am

---Advertisement---