अमोल जावळेंना डावललं ; रावेरमध्ये शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

रावेर । भाजपने काल बुधवारी सायंकाळी देशासह महाराष्ट्र्रातील  उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यानंतर कुठे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय तर कुठे नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. अशाच प्रकार रावेरमध्ये पाहायला मिळाला.

भाजपच्या दुसऱ्या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालीय. मात्र यानंतर रावेर लोकसभेतील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

रावेरमधून स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव तथा विद्यमान जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांचे नाव चर्चेत होते. मात्र रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने अमोल जावळे यांच्या समर्थकांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आहे.

यातूनच यावल-रावेरमधील शेकडो पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदांचे राजीनामे हे त्यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. कोणत्याही स्थितीत आपण रक्षा खडसे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.