अयोग्य विधायकों का क्या होगा?, नार्वेकरांनी दिले स्पष्ट संकेत

maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे यावर निर्णय कधी? असे प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनच्या दौऱ्यावर होते. ते आज मुंबईत परतले असून यासंदर्भात त्यांनी विमानतळावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?
सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निकालवर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याची प्रक्रिया किचकट आहे. हा निर्णय पुर्ण चौकशी केल्यानंतरच कायद्याच्या तरतुदीनुसार निर्णय घेतला जाणार आहे, कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, आणि उशीर देखील केला जाणार नाही. आपण सगळ्यांनी आश्वासित रहा जो निर्णय घेतला जाईल तो कायद्याच्या तरतुदीनुसार आणि सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार योग्य निर्णय घेवू अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं होतं की, विधानसभा अध्यक्षांवर दबाव निर्माण केला जात आहे. त्यावर राहुल नार्वेकर म्हणाले की, सभागृहाच्या बाहेर केलेल्या वक्तव्यावर मी बोलणार नाही. मी त्याकडेलक्ष देत नाही. कायद्याच्या तरतुदी नुसार निकाल घेतला जाईल. तर पुढे ते म्हणाले की, ‘मी कोणाच्या मनाप्रमाणे व्हावं म्हणून मी निर्णय घेणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतले जातील. कोणाला वाटतं असेल लवकर निर्णय यावा म्हणून आम्ही निर्णय देऊ शकत नाही. प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण झाली तर लगेच निर्णय येईल. विनाकारण विलंब होणार नाही, 10वं शेड्यूल लक्षात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं नार्वेकर म्हणाले आहेत.