तरुण भारत लाईव्ह । २७ सप्टेंबर २०२३। अयोध्येतील तीन मजली राम मंदिराच्या तळमजल्याचे काम डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार असून अयोध्येतील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. अशी माहिती मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली.
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून शिक्कामोर्तब झाले नसले तरी ते लवकरच होईल असे मिश्रा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समिती जलाभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींना औपचारिक पद्दतीने निमंत्रित करेल आणि या सोहळा दरम्यान रामललाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात स्थापना केली जाईल.
१४ जानेवारी रोजी होणाऱ्या मकर संक्रांतीनंतर रामललांच्या अभिषेकाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. निर्धारित अवधीतच मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार आहे. किमान हजार वर्षे धक्काही काही लागणार नाही. अशा प्रकारे त्या मंदिराची बांधणी करण्याची योजना आम्ही आपली असल्याचे नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी गर्भगृहातील देवतेच्या कपाळावर सूर्याची किरणे क्षणोक्षणी पडतील असे यंत्र मंदिरांच्या शिखरावर बसवण्याचे काम सुरू आहे हे यंत्र बंगरूळ तयार केले जात आहे. आणि त्याच्या संरचनेवर वैज्ञानिक देखरेख करीत आहेत.