अरेरे हे काय..! शौचालयात धुतले चहाचे कप; जळगाव महापालिकेतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव । सोशल मीडियामुळे कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल, हे काही सांगता येत नाही. जळगाव महापालिकेमधील असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल हात असून ज्यात महापालिकेमध्ये प्रसाधन तसेच शौचालय गृहातील बेसिंगमध्ये चहाचे कप धुतले जात असले जात असल्याचा धकाकदायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहेत प्रकार?
सध्या जळगावच्या महापालिकमधील घाण पाण्यात कपबशा धुतल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिथे प्रसाधनगृहामध्ये शौचालय सुद्धा असून या ठिकाणी असलेल्या बेसिंग मध्ये शिपाई कडून कप धुतले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे हेच कप आयुक्ताच्या दालनात कार्यालयातील मान्यवरांसाठी वापरण्यात येत असतात. दरम्यान, हा व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद करुन सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे.

दरम्यान महापालिकेतील या प्रकाराबद्दल तसेच कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.