---Advertisement---

अल्पवयीन तरुणीला दाखवले लग्नाचे आमिष, अनेकदा घेतला गैरफायदा, मात्र गर्भवती होताच… काय घडलं

---Advertisement---

जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर वारंवार अत्याचार केला. एवढेच नाही तर या अत्याचारातून पीडित तरुणी ही गर्भवती राहिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन तरुणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. येथील एका महाविद्यालयात पीडित तरुणी अकरावीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान तिची ओळख शिवम पाटील (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्याशी झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, शिवम पाटील याने पीडितेवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित तरुणी ही गर्भवती राहिली.

सदर प्रकार पिडीत तरुणीच्या नातेवाईकांना लक्षात आल्यांनतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित शिवम पाटील याच्याविरोधात चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment