धरणगाव : अल्पवयीन मुलीचा पाठलाग, लग्नाची मागणी करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
धरणगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेत असून १७ मार्च २०२२ पासून याच परिसरात राहणारा प्रविण जगतराव पाटील याने पिडीत मुलीला पाठलाग करून तिला लग्न करण्यासाठी पळून जावू असे सांगितले.
त्यानंतर पिडीत मुलीने याला नकार दिल्यावर तिला बदनामी करण्याची धमकी दिली. रविवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रविण पाटील हा पिडीत मुलीच्या घरासमोर येवून बोलण्यासाठी जबरदस्ती करत असताना तिचा हात पकडून विनयभंग केला. याबाबत नातेवाईकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या ताकारी नुसार प्रविण पाटील यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे