अल्पवयीन मुलीस पळवून नेत होता तरुण; अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पाचोरा : शहरातील एका भागातून अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून पळवून घेऊन जाणाऱ्या आरोपीस पाचोरा पोलिसांनी मोठया शिताफीने गुजरात येथून ताब्यात घेऊन अटक केली असून आरोपीच्या गुन्ह्यात ही वाढ करण्यात आली आहे. या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील एका भागातून दि. 13.04.2024 रोजी दुपारी 01.00 ते दुपारी 01.30 वाजेच्या दरम्यान रहात्या घरातुन अल्पवयीन मुलगी (वय – 16.5 वर्षे)
ही घरात कोणास काहीएक न सांगता निघुन गेल्याने व तिचा शोध घेण्यात आला परंतु मुलगी मिळुन न आल्याने तीस कोणीतरी अज्ञात
व्यक्तीने काहीतरी अज्ञात कारणासाठी आमिष दाखवुन पळवुन नेले असावे अशा संशयावरुन मुलीच्या बापाने दिलेल्या फिर्याद वरून अज्ञात आरोपीविरोधात भादवी कलम 363 नुसार पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांच्या कडे देण्यात आला होता.सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांनि विलंब न करता मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पोलीस कर्मचारी संतोष राजपूत व योगेश पाटील यांना सोबत घेत अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला असता अज्ञात आरोपी हा त्याच्या ताब्यातील मोटर सायकल क्र.( GJ-08/DE-3066) वरून अल्पवयीन मुलीस उज्जैन येथून शिरपूर दोंडाईचा मार्गे गुजरात पळून जात असतांना पाचोरा पोलिसांनी
मोठ्या शिताफीने दि.15 एप्रिल रोजी पलसाना गुजरात येथून रात्री 8:30 वाजेच्या सुमारास मोटर सायकल सह ताब्यात घेऊन पाचोरा पोलीस ठाण्यात हजर केले असून पीडित मुलीच्या जवाबावरून अज्ञात आरोपीचे नाव हे अशोक शांतिभाई वनकर (चव्हाण)रा.हल्ली मुक्काम संत गाडगेबाबा नगर,पाचोरा, मूळ रा.पवडासन पोस्ट दुवा तालुका थराड जिल्हा बनासकांठा गुजरात असे निष्पन्न झाले असून पीडित मुलीच्या जवाबवरून सदरील गुन्ह्यात भादवी कलम 366,376 (2),(N),376 (2) (I) त्याच प्रमाणे बालकांचे लैगिक अपराधापासून सरक्षण अधिनियम2012चे कलम 2,6,8,12 नुसार वाढ करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

आरोपी सह पिडीतचे मेडिकल करण्यात आले असून पीडित ची बालकल्याण समिति जळगाव येथे रवानगी करण्यात आली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.