---Advertisement---

अल्पवयीन मुलीला पळविले

---Advertisement---

यावल : तालुक्यातील एका गावातील साडेसोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


यावल तालुक्यातीत वढोदा गावातील 16 वर्ष पाच महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अज्ञाताने काहीतरी फूस लावून पळवून नेले. मुलीचा सर्वत्र शोध घेवूनही ती न आढळल्याने मुलीच्या आईने यावल पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक राजेंद्र पवार करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment