जळगाव : जिल्ह्यात अवकाळीचा फटका सर्वत्र बसला असून, चोपडा तालुक्यात आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी तात्काळ महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश, विमा कंपन्यांनीही ऑफलाइन ताबडतोब तक्रारी स्वीकारून योग्य ते सहकार्य करावे अशा सूचना केल्या.
चोपडा तालुक्यात अवकाळीने उद्भवलेल्या अस्मानी संकटाच्या कचाट्यात बळीराजा सापडला आहे. हे ओळखून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी अकुलखेडा, चहार्डी,धुपे , हातेड बु,, हातेड खु, घाडवेल , दोंदवाडे, तांदलवाडी,काजीपूरा, निमगव्हाण, गरताड, कुरवेल ,कोळंबा भागातील शेत शिवारात पोहचून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी अंमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात , तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, कृषी सहाय्यक, सर्कल ,तलाठी, कोतवाल सर्वच महसूल विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारींचा फौज फाटा घटनास्थळी उपस्थित होता.
हरभरा, गहू ,मका , दादर या रब्बी पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने तात्काळ पंचनामे करा असे आदेशही फर्मावून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन प्रा.सोनवणे यांनी दिले. पिक विमा कंपन्यांनीही ऑफलाइन तक्रारी त्वरित स्विकारून बळीराजाला मदत करावी अशा सूचनाही दिल्या. ते दिवसभर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देत आहेत;
चोपडा तालुक्यात वादळा सह गारांचा जोरदार पाऊसाने थैमान घातल्याने शेतकरी राजाचाचा तोंडाजवळ आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने तो पार खचला असावा हा दूरदृष्टी विचार मनी ठेवत त्यांचे आसवे पुसणे आपलेआद्य कर्तव्य समजत माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, शिवराज पाटील, राजेंद्र पाटील गावातील नुकसानग्रस्त भाग पिंजून काढत भेट देत शेतकऱ्यांना धीर दिला.माजी आमदारांच्या या अॅक्शन मोडला मात्र सॅल्यूट ठोकून आपल्या आसवांना वाट मोकळी केल्याचे ह्रदयद्रावक प्रसंग पाहावयास मिळाल्याने अनेकांनी त्यांचे मनोमन आभार मानले.