जळगाव : पारोळा तालुक्यातील इंधवे शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य व रसायन नष्ट केले.
पारोळा तालुक्यात अवैद्य गावठी दारूचे प्रमाण वाढले आहे. अशा अवैद्य गावठी दारू विक्रेत्यांवर पारोळा पोलिसांची करडी नजर असून पोलीस निरीक्षक सुनील पवार हे सदर घटनेबाबत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आज गोपनी माहितीच्या आधारे तालुक्यातील इंदवे शिवारातील दोन ठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याचे समजताच पोलिसांनी सदर दोन्ही घटनेच्या ठिकाणी जाऊन सदरील साहित्य व माल नष्ट केला. यावेळी शिवारात विविध ठिकाणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असून तालुक्यात इतर ठिकाणी अशी अवैध गावठी दारू विक्री होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिला आहे.
दरम्यान येणाऱ्या काळात सण उत्सव सुरू होत असून कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. यासाठी तालुक्यातील शहरवासीयांनी चोरी, अवैद्य गावठी दारू विक्री तसेच अशांतता निर्माण करणार्याची माहिती पोलिसांकडे माहिती द्यावी. जेणेकरून योग्य वेळी अंमलबजावणी करून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात आली. दरम्यान तारीख २५ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पारोळा तालुका आढावा बैठकीत इंदवे येथील ग्रामस्थांनी परिसरातील गावठी हातभट्टी दारू बाबत निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत तारीख २६ रोजी परिसरातील दोन ठिकाणी गावठी दारूभट्टी वर धाड टाकून दारू नष्ट करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे व ग्रामस्थांच्या दिलेला निवेदनाचे तात्काळ दाखल घेतल्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले.