धरणगाव : अवैध दारू धंद्याविरोधात तालुका पोलिसांत कारवाई सुरु केली असून, आज गुरुवारी गावठी दारूसाठी लागणार तब्बल चाळीस हजाराचे रसायन पोलिसांनी नष्ट केले. याबाबत पोलिसांत दोन जणांवर गुन्हा दाखल झाला. निंभोरा, नांदेड येथे हे रसायन नष्ट करण्यात आले.
पोलीस शिपाई नागराज साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गोलू गोकुळ ठाकरे (रा. निंभोरा), तर पोलीस नाईक पाटील यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल रघुनाथ कोळी (रा. निंभोरा) तर तिसऱ्या फिर्यादीत पोलीस नाईक दीपक पाटील यांच्या फिर्यादीवरून छोटू लोटन कोळी व संदीप कोळी (रा. निंभोरा) यांच्याविरुद्ध तर चौथ्या फिर्यादीत पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून शांताराम कौतिक कोळी व राजू सोमा कोळी दोन्ही (रा.नांदेड) विरुद्ध मुंबई दारूबंदी कलम ६५ फ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.