अवैध गुटखाची तस्करी; १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त

तळोदा : भवर ते तळोदा भवर फाट्यावर ३० रोजी रात्री साडेआठ वाजता पोलिसांनी १ लाख ७ हजार ४०० रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. या प्रकरणी जाबिर नवाब अन्सारी रा.इलाही चौक, तळोदा याच्या विरोधात तळोदा पोलिसात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे.

तळोदा तालुक्यात ३० रोजी रात्री ८:३० वा. चे सुमारास भवर ते तळोदा भवर फाट्यावर येथे रोडवर सार्वजनिक जागी १,०७,४००/- रुपयांचा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला विमल गुटखा, एक काळ्या रंगाची सुझुकी कंपनीची बुमरा स्ट्रीट GJ ०५ EZ १३३६ नंबर प्लेटची मोटारसायकल असा एकूण १,०७,४००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जाबिर नवाब अन्सारी रा.इलाही चौक, तळोदा याच्या विरोधात तळोदा पोलिसात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भवर ते तळोदा रस्त्यावर आरोपीने मानवी जिवितास व आरोग्यास हानिकारक असणारा विमल पानमसाला, तंबाखू गुटखा हा ता. कुकरमुंडा जि. तापी राज्य गुजरात येथील भावेष अनीलभाई तांबोळी यांचे दुकानावरून खरेदी करून अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने स्वतः जवळ बाळगतांना मिळून आला. पो ह कॉ. पौलाद भिका भिल यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी जाबिर नवाब अन्सारी याच्या विरुद्ध तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक राजेन्द्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोसई. धर्मेंद्र पवार करीत आहेत.