भडगाव : अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर चाळीसगाव पोलीस विभागीय पोलीस पथकाने शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी कारवाई केली. या कारवाईत ५ डंपर, ५ स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर, २ जेसीबी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सात जणांविरोधा भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भडगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने व भडगाव पोलिसांच्या पथकाने संयुक्तिकरित्या भडगांव गिरणा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या ठिकाणावर २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री छापा टाकला. याप्रकरणी संदीप मुरलीधर पाटील वय ४१ रा. वडगाव सतीचे ता. भडगाव, अक्षय देवीदास मालचे वय २० , प्रविण विजय मोरे वय २०, मच्छिंद्र गिरधर ठाकरे वय २१, ललीत रामा जाधव वय २२, शुभम सुनिल भील वय २१ आणि रणजीत भास्कर पाटील सर्व रा. भडगाव यांच्या विरोधात पोकॉ. राहूल महाजन यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणत आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्ष डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्ष कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधिक्ष अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुषार देवरे, पोना. राजेंद्र निकम, पोहेकॉ भगवान पाटील , विकास पाटील, विश्वास देवरे, महेश बागुल, चेतन राजपूत, सुनिल मोरे, श्रीराम कांगणे, समाधान पाटील, राहूल महाजन, पोकॉ सुदर्शन घुले यांनी केली.